अर्धवट उपचार करून रुग्णांचा वेळ आणि पैसा यांची हानी करणारे अन् त्यांना मनस्ताप देणारे माणुसकीहीन दंतवैद्य !

१. स्वस्त दरातील उपचारांचे आमिष दाखवून रुग्णांना आकर्षित करणे आणि अर्धवट उपचार करणे

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात एका न्यासाच्या दंत रुग्णालयात एक दंतवैद्य दंतोपचार करतात. त्या ठिकाणी स्वस्त दरात उपचार होत असल्यानेे मी उपचारांसाठी माझे नाव नोंदवले. प्रारंभी तेथील दंतवैद्यांनी चांगले दंतोपचार केले. पुढे-पुढे मात्र ते मला, तसेच अन्य रुग्णांना उपचारांसाठी बोलावून स्वतः अनुपस्थित रहायला लागले. त्यामुळे वृद्ध आणि दुरून येणार्‍या रुग्णांच्या वेळेची आणि पैशांची हानी व्हायला लागली. त्या दंतवैद्यांनी अनेक जणांचे उपचार अर्धवटच केलेे. त्यांपैकी बर्‍याच जणांनी वाट पाहून त्यांचे उपचार अन्य खासगी दवाखान्यात पूर्ण करून घेतले.

२. उपचारांसाठी आगाऊ रक्कम घेऊनही अन्य जिल्ह्यांत हेलपाटे घालून उपचार पूर्ण करायला लावणे

या दंतोपचारांसाठी त्यांनी माझ्याकडून ८ सहस्र रुपये उपचारांपूर्वीच भरून घेतले. त्याची त्यांनी पावतीही दिली नाही. पैसे घेऊनही त्यांनी माझे उपचार अपूर्ण केले. उपचार पूर्ण करण्यासाठी मला सतत हेलपाटे घालावे लागत होते. त्यानंतर आम्ही त्यांच्या रत्नागिरी येथील शाखेत गेलो. तेथे गेल्यावर त्यांनी आम्हाला त्यांच्या कोल्हापूर येथील शाखेचा पत्ता दिला. त्यानंतर आम्ही कोल्हापुरात जाऊन सतत पाठपुरावा करून आमचे उपचार पूर्ण करवून घेतले. यामध्ये आमचा वेळ आणि पैसा यांची हानी तर झालीच; पण मानसिक त्रासही झाला.’

– सौ. प्रतिभा चव्हाण, कणकवली, सिंधुदुर्ग.

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मोहीम !

वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला त्वरित कळवा.

चांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती !

पैसे लुबाडणार्‍या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया आम्हाला साहाय्य करा. ही तुमची साधनाच असेल. तुम्हाला तुमचे नाव गोपनीय ठेवण्याची इच्छा असल्यास ते गोपनीय ठेवण्यात येईल.

आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता

सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा – ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

इ-मेल पत्ता : [email protected]

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now