६ अविवाहित जोडप्यांना समलैंगिक संबंध ठेवल्यावरून चाबकाचे फटके

इंडोनेशियामध्ये शरीयत कायद्यानुसार शिक्षा

भारतातील पुरो(अधो)गामी याविषयी काही बोलतील का ?   

बांदा एसेह (इंडोनेशिया) – इंडोनेशियाच्या रूढीप्रिय एसेह प्रांतामध्ये नुकतेच ६ अविवाहित जोडप्यांना समलैंगिक संबंध ठेवल्याविषयी शरीयत कायद्यानुसार शिक्षा करण्यात आली. या जोडप्यांना सार्वजनिक ठिकाणी चाबकाने मारहाण करण्यात आली. सुमात्रा बेटावरील या प्रांतामध्ये जुगार खेळणे, दारू पिणे आणि समलैंगिक संबंध ठेवणे या गुन्ह्यांसाठी कोडे मारण्याची शिक्षा सर्रासपणे दिली जाते. जगात सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या देशात हा एकमेव प्रांत आहे, जेथे शरीयत हा इस्लामी कायदा लागू आहे. या प्रांताचे राजधानीचे शहर असलेल्या बांदा एसेह येथील एका उपाहारगृहामध्ये धाड घालून या ६ जोडप्यांना अटक करण्यात आली होती.


Multi Language |Offline reading | PDF