बालाकोट येथील आक्रमणात झाडांची हानी झाल्यावरून पाककडून भारतीय वैमानिकांच्या विरोधात गुन्हा नोंद

बालाकोट येथे आतंकवादी ठार झाल्याचा गुन्हा नोंदवता येत नाही; म्हणून पाकची ही नवीन क्लृप्ती !

इस्लामाबाद – २६ फेब्रुवारीला भारतीय वायूदलाने पाकमधील बालाकोट येथील जैश-ए-महंमदच्या आतंकवादी प्रशिक्षण केंद्रावर केलेल्या आक्रमणात १९ वृक्षांची हानी झाल्याचा आरोप करत पाकने भारतीय वैमानिकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पाकिस्तान सरकारमधील मंत्री मलिक अमीन असलम यांनी म्हटले की, भारताच्या विमानांनी बालाकोटच्या जाबा टॉपच्या पर्वतीय क्षेत्रात बॉम्बस्फोट केला. या विमानांनी वन विभागाला लक्ष्य केले. त्यामुळे येथील झाडांची पुष्कळ मोठी हानी झाली आहे. हा पर्यावरणीय आतंकवाद आहे. येथील बरीच झाडे कोसळली आहेत. त्यामुळे पर्यावरणाला मोठा धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या प्रस्तावानुसार भारतीय वायूदलाने केलेले आक्रमण आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारे आहे. (पाककडून करण्यात येणारा आतंकवाद कोणत्या नियमात बसणारा आहे, हे असलम यांनी सांगावे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now