नायगाव (यवतमाळ) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

नायगाव (यवतमाळ), ९ मार्च (वार्ता.) – येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ७४ हिंदूंनी सभेचा लाभ घेतला. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या प्रयत्नांत सहभागी होण्यासाठी साधना करून खारीचा वाटा उचलूया’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. लहू खामणकर यांनी या वेळी केले. गावातील सर्वश्री गणपती राजूरकर, मंगल धोबे, शंकर राजूरकर यांनी सभेसाठी मोलाचे सहकार्य केले. सभेनंतरच्या आढावा बैठकीस ८ जण उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF