पाकच्या राज्यसभेच्या सभापती म्हणून प्रथमच हिंदु महिलेची नियुक्ती

पाकमध्ये पहिल्यांदा हिंदु महिलेला असे पद दिले गेले; मात्र भारतात गेल्या ७१ वर्षांत अनेक उच्च पदांवर मुसलमान महिलांना संधी देण्यात आली आहे. तरीही ‘अल्पसंख्यांकांवर अन्याय होतो’, असे म्हणत उर बडवला जातो !

इस्लामाबाद – पाकच्या राज्यसभेतील हिंदु महिला खासदार कृष्णा कुमारी कोहली (वय ४० वर्षे) यांची सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाकच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हिंदु महिलेची या पदावर नियुक्ती झाली आहे. आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त त्यांना सभापतीपद देण्यात आले. याची माहिती खासदार फैसल जावेद यांनी ट्विटरवरून दिली. ‘या पदावर विराजमान होतांना मी स्वत:ला भाग्यवान समजते’, अशा शब्दांत कृष्णा कुमारी कोहली यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी समाजशास्त्र विभागातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. त्या पाकिस्तान पिपल्स पक्षाच्या खासदार आहेत. त्यांचा भाऊही याच पक्षात आहे.


Multi Language |Offline reading | PDF