पाकिस्तानमध्ये बलुची संघटनेकडून गॅस पाईपलाईन उद्ध्वस्त

इस्लामाबाद – पाकच्या बलुचिस्तानमधील ‘बलोच लिबरेशन टायगर’ या संघटनेने बलुचिस्तानमध्ये असणार्‍या डेरा बुगती येथील गॅस पाईपलाईन उद्ध्वस्त केली. गेल्या १ मासात या संघटनेनेे केलेले हे तिसरे आक्रमण आहे. सुई गॅस प्रकल्पाजवळील ही गॅस पाईपलाईन उद्ध्वस्त केल्यामुळे ४ जणांचा मृत्यू झाला.

१. पाकिस्तान सरकार बलोच जनतेच्या हक्काच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करत आहे, त्यामुळे हे आक्रमण केले, असे या संघटनेने म्हटले आहे.

२. बलुचिस्तानमधील सर्व इंधन हे पाकच्या पंजाब प्रांताला मिळते; परंतु बलोच जनतेला काही मिळत नाही. आमच्या हक्काच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर पाकने डोळा ठेवल्यास अशी आक्रमणे पुन्हा करू, अशी चेतावणीही या संघटनेने दिली आहे.

३. यापूर्वी या संघटनेने ‘सीपेक’ प्रकल्पावर आक्रमण केेले होते. त्यानंतर क्वेट्टा येथे केलेल्या आक्रमणात १५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला होता.


Multi Language |Offline reading | PDF