पाकमधील पूर्वीच्या कोणत्याही सरकारने आतंकवाद्यांवर कारवाई केली नाही !  – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्वीकृती

  • पाकमधील पूर्वीच्या ज्या सरकारांनी आतंकवाद्यांवर कारवाई केली नाही, त्या सरकारमधील संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस इम्रान खान दाखवणार का ?
  • मागच्याच नव्हे, तर आता स्वतः इम्रान खान यांच्या सरकारनेही आतंकवाद्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही, याचे पुलवामा येथील आक्रमण प्रत्यक्ष उदाहरण आहे !
  • इम्रान खान यांनी आतंकवाद्यांवर कारवाई केली असती, तर आतापर्यंत मसूद अझहर, हाफीज सईद, दाऊद इब्राहिम यांच्यासहित भारतात आतंकवादी कारवाया करणारे सर्वच सूत्रधार आणि आतंकवादी त्यांनी भारताच्या कह्यात दिले असते !
  • इम्रान खान यांना खरेच कारवाई करत असल्याचे दाखवायचे असेल, तर या आतंकवाद्यांना त्वरित भारताच्या कह्यात द्यावे आणि पाकमधील आतंकवाद्यांची सर्व प्रशिक्षणकेंद्रे आणि आतंकवादी निर्मितीचे कारखाने असलेले मदरसे बंद करावेत !

इस्लामाबाद – पाकमधील आधीच्या कोणत्याही सरकारने आतंकवादी संघटना आणि आतंकवादी यांच्यावर कारवाई केली नाही, अशी स्वीकृती पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील एका सभेत ते बोलत होते.

१. इम्रान खान पुढे म्हणाले की, माझे सरकार देशाबाहेरील आतंकवादी आक्रमणांमध्ये सहभागी असणार्‍या कोणत्याही आतंकवादी संघटनेला पाकच्या भूमीचा वापर करू देणार नाही. आमच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे सरकार आल्यापासून आम्ही राष्ट्रीय योजना बनवून त्याकडे गांभीर्याने लक्ष देत आहोत. याअंतर्गत आतंकवादाशी सामना करण्यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे.

२. सध्या पाकने १८२ मदरसे नियंत्रणात घेतले असून पाकने बंदी घातलेल्या संघटनांशी संबधित असलेल्या १२१ आतंकवाद्यांना अटक केली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now