‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाने गाठला आणखी एक महत्त्वाचा टप्पा – संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची एकूण संख्या पोहोचली ५ कोटींपर्यंत !

www.ssrf.org हे संकेतस्थळ ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या वतीने चालू करण्यात आले आहे. आरंभी संपूर्णपणे नवीन असलेल्या या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंची संख्या प्रतिवर्षी वेगाने वाढत गेली. जवळपास वर्ष २०१२ पासून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.

सद्गुरु सिरियाक वाले

१. संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत असलेल्या विविध विषयांवरील आध्यात्मिक माहितीमुळे ‘गूगल’ने एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाचा समावेश पहिल्या १० शोध निकालात (‘सर्च रिझल्ट्स’मध्ये) करणे

संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत असलेल्या विविध विषयांवरील आध्यात्मिक माहितीमुळे ‘आध्यात्मिक संशोधन’, ‘चंद्रग्रहण म्हणजे काय ?’, ‘मृत्यूत्तर जीवन’, ‘आध्यात्मिक उपाय’, ‘दहन कि दफन करणे योग्य ?’, ‘मृत नातेवाईक स्वप्नात येणे’, ‘सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता म्हणजे काय ?’ इत्यादी शोधनशब्दांसाठी (‘कीवर्ड्स’साठी) ‘गूगल’ने एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाचा समावेश पहिल्या १० शोध निकालात (‘सर्च रिझल्ट्स’मध्ये) केला आहे.

२. संकेतस्थळाला आरंभ झाल्यापासून आतापर्यंत भेट देणार्‍यांची एकूण संख्या ५ कोटींपर्यंत पोहोचणे

१५.१.२०१९ या मकरसंक्रातीच्या शुभदिनी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाला १३ वषेर्र् पूर्ण झाली. २९.१.२०१९ या दिवशी म्हणजे वर्धापन दिनानंतर दोन आठवड्यांनी या संकेतस्थळाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. त्या दिवशी या संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या ५ कोटी झाली. संकेतस्थळाला आरंभ झाल्यापासून आतापर्यंत भेट देणार्‍यांची ही एकूण संख्या आहे. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावरील लेख १२ कोटी वेळा पाहिले गेले आहेत. याचाच अर्थ भेट देणारा प्रत्येक जिज्ञासू प्रत्येक भेटीत सरासरी २-३ लेख वाचतो. सुमारे २ कोटी जिज्ञासूंनी या संकेतस्थळाला नऊ अथवा त्यापेक्षाही अधिक वेळा भेट दिली आहे. ‘ज्या जिज्ञासूंना ‘अध्यात्म’ आणि ‘साधना’ या विषयांत रस असतो, त्यांना या संकेतस्थळावरील ज्ञान खरेच आवडते’, हेच यातून सिद्ध होते.

३. गेल्या १३ वर्षांत जगातील प्रत्येक देशातील लोकांनी या संकेतस्थळाला भेट दिलेली असणे

गेल्या १३ वर्षांत जगातील प्रत्येक देशातील लोकांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे. या संकेतस्थळावरील आध्यात्मिक ज्ञानाला संपूर्ण जगाने स्वीकारल्याची ही पावतीच आहे. संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंमध्ये प्रामुख्याने अमेरिका, भारत, इंडोनेशिया, जर्मनी आणि युनायटेड किंगडम या ५ देशांतील जिज्ञासूंचा समावेश आहे.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले  यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन यांमुळे सध्याच्या जगाला आवश्यक असलेले आध्यात्मिक ज्ञान या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे शक्य होत आहे. यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) सिरियाक वाले, प्रमुख मार्गदर्शक, स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.), फ्रान्स (३.२.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF