(म्हणे) ‘पनवेल येथील सनातनच्या केंद्रात हत्यारे सापडली !’

भारिप बहुजन महासंघाचे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांचा जावईशोध !

‘डाव्यांकडे अख्खा नक्षलवाद आहे’, असे म्हणणार्‍या अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी सनातनवर अशा प्रकारचा आरोप करणे हास्यास्पद ! सनातनच्या कोणत्याही केंद्रात हत्यारे सापडल्याचे कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने म्हटलेले नाही किंवा तसे सिद्धही झालेले नाही. असे असतांना सनातन संस्थेवर बेछूट आरोप करणारे आंबेडकर स्वत:ला अन्वेषण यंत्रणांपेक्षा शहाणे समजतात का ? धादांत खोटे आरोप करून राष्ट्र आणि धर्म यांसाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्‍या सनातन संस्थेची अपकीर्ती करणारे आंबेडकर यांच्या या विधानांविषयी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !

नवी मुंबई – पनवेलमधील सनातनच्या केंद्रात हत्यारे सापडली, असा धादांत खोटा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी खांदा कॉलनी येथे ‘बहुजन वंचित आघाडी’च्या सभेत ७ मार्च या दिवशी केला.

आंबेडकर या वेळी म्हणाले की,

१. ‘आम्ही संविधान (राज्यघटना) पालटू’, असे म्हणण्याचे रा.स्व. संघाचे धैर्य का झाले ? पनवेलमधील सनातन्यांच्या केंद्रात हत्यारे सापडली. ती का, तर इथल्या कुटुंबशाहीमुळे, हे लक्षात घ्या. ‘तुम्ही तुमचे काम करा. आम्ही आमचे काम करतो’, अशी त्यांची भूमिका आहे. यामुळे पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांचा बळी गेला. हे सर्वजण देशातील माणसाला डोळस करत होते; म्हणून त्यांचा बळी गेला.

२. पनवेलमधील सनातन्यांचे केंद्र लोकांना आंधळे आणि भयभीत करायला निघाले असून धार्मिकतेने ग्रस्त करत आहे. (आतापर्यंत शेकडो जिज्ञासूंसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पनवेल येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊन तेथील ईश्‍वरी चैतन्याची आणि सात्त्विकतेची अनुभूती घेतली आहे अन् तसे अभिप्रायही सनातन प्रभातमधून वेळोवेळी प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे आंबेडकर हेच आंधळेपणाने आरोप करत असून लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहेत ! – संपादक)

३. आम्ही कोणत्या देवा-धर्माच्या विरोधात नाही; परंतु देवा-धर्माच्या नावाने राजकारण चालले आहे, त्याला विरोध आहे.

४. एकातरी पनवेलवाल्याने सांगावे की, त्याने सनातन्यांचे हे केंद्र, मंदिर पूर्ण फिरले आहे. तेथे अर्ध्यापर्यंत जाता येते; पण पुढे अर्ध्यापर्यंत जाता येत नाही. हे केंद्र मंदिर असले, तर सर्वच ठिकाणी जाता आले पाहिजे होते. (हे विधान आंबेडकर यांनी कशाच्या आधारावर केले ? सनातन आश्रमाचे दरवाजे श्रद्धावंतांस, भाविकांस आणि साधना करणार्‍या प्रत्येकाला उघडेच आहेत; मात्र सनातनद्वेषाची झापडे ज्यांनी पांघरली आहेत, त्यांना कधी सनातन आश्रमाचे महत्त्व लक्षात येणार नाही ! – संपादक)

५. दहशतवादी अड्ड्यांप्रमाणे (टेरेरिस्ट कॅम्पप्रमाणे) हे नवीन दहशतवादी अड्डे उभे राहिले आहेत. (असे असते, तर आंबेडकर यांनी अशी विधाने करण्याचे धाडस तरी केले असते का ? हिंदु धर्माचे कार्य चालणार्‍या आश्रमांना ‘दहशतवादी अड्डे’ संबोधून आंबेडकर यांनी त्यांची खुजी मानसिकताच दाखवली आहे. आतंकवादी अड्डे म्हणजे काय असते, याचा अनुभव आंबेडकर पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन घेऊ शकतात ! – संपादक) येथील सेना, भाजप आणि काँग्रेसवाले यांच्याकडे त्यांच्या विरोधात सत्ता वापरण्याची हिंमत नाही.

६. येथे सर्वांना स्वत:चेच संरक्षण करायचे असेल, तर अमेरिकेप्रमाणे आपणही हत्यारे ठेवू. आम्ही हत्यारे ठेवण्यासाठी परवाना मागूनही तो आम्हाला दिला जात नाही.

७. धर्माच्या नावाने चाललेल्या या बेबंदशाहीला सत्ता पालटल्याविना आळा घालता येणार नाही.


Multi Language |Offline reading | PDF