(म्हणे) ‘देशात मुसलमान भीतीच्या छायेत जगत असल्याने देश सर्वांचा आहे का ? हे मोदी यांनी स्पष्ट करावे !’ – फारूख अब्दुल्ला

काश्मिरी व्यापार्‍याला मारहाणीचे प्रकरण

  • फारूख अब्दुल्ला यांनी प्रथम काश्मीर देशातील सर्वांचा आहे का ? हे स्पष्ट करावे !
  • कलम ३७० घालून काश्मीरव्यतिरिक्त भारतातील नागरिकांना येथे भूमी घेण्यास आणि रहाण्यास जी बंदी घालण्यात आली आहे, ती हटवून ‘काश्मीर सर्वांचा आहे’, यासाठी अब्दुल्ला यांनी आतापर्यंत प्रयत्न का केले नाहीत ? हे सांगावे !
  • वर्ष १९८९ मध्ये काश्मीरमधील मशिदींमधून उद्घोषणा करून तेथील हिंदूंना बायका आणि संपत्ती सोडून जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर साडेचार लाख हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, ते अद्याप काश्मीरमध्ये परतू शकलेले नाही. या काळात सहस्रो हिंदूंना ठार करण्यात आले. या हिंदूंना ‘काश्मीर आपला आहे’, असे वाटण्यासाठी अब्दुल्ला यांनी ते मुख्यमंत्री आणि केंद्रीयमंत्री असतांना काय प्रयत्न केले, ते सांगायला हवे !
  • काश्मीरच्या विकासासाठी आतापर्यंत देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक पैसे देण्यात आले. हे पैसे ज्या भारतियांच्या करातून देण्यात येत होते आणि येत आहेत, त्या भारतियांना काश्मीर आपला वाटण्यासाठी काश्मीरच्या नेत्यांनी काय केले, हे अब्दुल्ला यांनी सांगायला हवे !

नवी देहली – मुसलमान आणि अल्पसंख्यांक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. मला वाटते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘देश कोणा एका पक्षाचा किंवा ठराविक लोकांचा नाही. हा देश सर्वांचाच आहे’, हे स्पष्ट केले पाहिजे, असे आवाहन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदी यांना केले आहे. २ दिवसांपूर्वी लक्ष्मणपुरी येथे एका काश्मीर व्यापार्‍याला काही लोकांनी मारहाण केली होती. त्यावरून अब्दुल्ला यांनी हे आवाहन केले आहे.

अब्दुल्ला पुढे म्हणाले की, आपल्या डोक्यावर युद्धाची टांगती तलवार आहे. अशा दुर्दैवी परिस्थितीत आपण सापडलो आहोत. आम्हाला लोकांमध्ये शांतता आणि समजूतदारपणा हवा आहे; मात्र दुर्दैवाने या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष अनेक जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून हेच आपल्या देशाचे दुर्दैव आहे. (मेहबूबा मुफ्ती आणि फारूख अब्दुल्ला यांनी प्रथम काश्मीरमध्ये निर्माण करण्यात आलेला हिंदुद्वेष ते का नष्ट करू शकत नाहीत, हे सांगावे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now