सद्गुरु सिरियाकदादा यांच्या आज्ञेनुसार तातडीची सेवा करतांना नामजपादी उपायांचा कालावधी न्यून करून सेवा केल्यावर सेवेत आनंद अनुभवणे; मात्र इतर वेळी नामजप न करता सेवा केल्याने त्रास होणे आणि यावरून संतांचे आज्ञापालन करण्याचे महत्त्व लक्षात येणे

सद्गुरु सिरियाक वाले
सौ. लवनिता डूर्

‘एकदा मला तातडीची एक सेवा देण्यात आली होती. ती सेवा मला १ – २ दिवसांत पूर्ण करून द्यायची होती. एरव्ही मी सेवेला प्रतिदिन केवळ १ घंटाच देऊ शकते; पण ही सेवा पूर्ण करण्यासाठी मला २ घंटे अधिक लागणार होते. त्यामुळे ‘नामजपादी उपायांचे घंटे न्यून करून त्या वेळेत सेवा करू का ?’, असे मी दायित्व असणार्‍या साधकांना विचारले. तेव्हा सद्गुरु सिरियाकदादा यांनी मला सांगितले, ‘सेवा पूर्ण होईपर्यंत उपायांचा कालावधी न्यून केला, तरी चालेल.’ मला ४ – ५ घंटे नामजपादी आध्यात्मिक उपाय करण्यास सांगितले आहे; परंतु त्या २ दिवसांत मी केवळ २ घंटेच उपाय केले, तरी मला कोणताच त्रास झाला नाही. उलट मला सकारात्मक आणि आनंदी वाटत होते, तसेच देवाशी माझे अनुसंधानही टिकून होते. ही सेवा करतांना मला स्थळ-काळाचेही भान न राहून मी स्वतःला पूर्ण विसरून एकाग्रतेने सेवा करत होते. तातडीची ही सेवा पूर्ण झाल्यानंतर मला संगणकीय पत्रांना उत्तरे देण्याची सेवा करायची होती; पण तोपर्यंत मी केवळ एक घंटाच उपाय केले होते. त्यामुळे काही मिनिटांतच मला त्रास होऊ लागला आणि सुस्पष्टपणे विचार करणेही कठीण झाले. त्यामुळे ‘सेवा करण्यापूर्वी आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक आहे’, असे माझ्या लक्षात आले. या अनुभूतीवरून संतांचे आज्ञापालन करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार उपायांचा कालावधी न्यून करून मी सेवेला प्राधान्य दिले. तेव्हा मला त्रास न होता चांगले वाटले; पण अन्य दिवशी उपाय पूर्ण झाल्यानंतरच मला चांगले वाटते.’

– सौ. लवनिता डूर्, ऑस्ट्रिया, युरोप. (२७.३.२०१७.)

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now