आतंकवाद्यांची आश्रयस्थाने पाकने नष्ट करावीत ! – अमेरिका

अमेरिकेने अनेकदा अशा प्रकारचे आवाहन केलेेले असतांना पाकने प्रत्यक्षात काहीच केलेले नाही, ही वस्तूस्थिती आहे, त्यामुळे असे आवाहन करण्यापेक्षा आता पाकवर थेट कारवाईची आवश्यकता आहे आणि अमेरिकेने त्यासाठी पुढाकार घ्यावा !

रॉबर्ट पालाडिनो

वॉशिंग्टन – पाकने संयुक्त राष्ट्र परिषदेने आखून दिलेल्या दायित्वांचे पालन करत आतंकवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करावीत. तसेच त्यांना करण्यात येणारा वित्तपुरवठाही रोखावा, असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ता रॉबर्ट पालाडिनो यांनी केले आहे. पाकने मदरसे आणि आतंकवादी यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेने हे आवाहन केले आहे.

पालाडिनो म्हणाले की, पाकिस्तान आतंकवादाविरोधात उचलत असलेल्या पावलांवर अमेरिकेचे लक्ष आहे. भविष्यात आतंकवादी आक्रमण होणार नाहीत आणि संपूर्ण क्षेत्रात स्थैर्य प्राप्त होईल, अशा दृष्टीने पाकने कायमस्वरूपी कारवाई करावी.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now