मोठ्या आवाजात ढोल वाजवणार्‍या युवतींचे मातृत्व भविष्यात धोक्यात !

तज्ञांनी यासमवेत डॉल्बीचे दुष्परिणामही सांगितले असते, तर बरे झाले असते ! परंपरेने स्त्री-पुरुषांमध्ये कामांची विभागणी ही त्यांच्या नैसर्गिक शरीररचनेच्या दृष्टीने केलेली असते, हे शास्त्र लक्षात न घेता स्त्री-पुरुष समानतेच्या खोट्या अभिनिवेशापोटी सध्या युवतींनी मोठे ढोल वाजवण्याची टूम (फॅशन) निघाली आहे. प्रत्येक गोष्ट विज्ञानाने सिद्ध झाल्यावरच डोळे उघडणार का ?

ठाणे – ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मोठ्या आवाजाच्या वाद्यांना विरोध झाल्यावर मोठ्या जोशात पारंपरिक ढोल वाजवणार्‍या तरुणींचे मातृत्व भविष्यात धोक्यात येऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. अवजड ढोल तासन्तास कमरेला बांधल्याने गर्भाशयावर ताण येऊन गर्भधारणा होण्यात अडचणी येऊ शकतात, असे तज्ञांच्या निदर्शनास आले आहे. पुण्यातील श्रवणतज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी ध्वनीप्रदूषणावर केलेल्या अभ्यासातून हे निरीक्षण नोंदवले आहे.

मोठ्या ध्वनीलहरींचा परिणाम वादकाच्या शरिरावरही होत असल्याने युवतींनी अधिक वेळ ढोल वाजवल्यास गर्भाशयाला धक्के बसून ते कमकुवत होत असल्याने भविष्यात गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. त्या ध्वनीलहरींची मूलभूत वारंवारता (फंडामेंटल फ्रिक्वेन्सी) २० हर्ट्झपेक्षा अल्प आहे आणि ती शरिराला अपायकारक आहे. याचे दुष्परिणाम कालांतराने दिसू शकतात, असे तज्ञांचे निरीक्षण आहे.


Multi Language |Offline reading | PDF