संभाजी भिडे यांच्यावर कारवाई का केली नाही ? याचे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्रावर द्या ! – उच्च न्यायालय

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

मुंबई – कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी दाखल एफ्आयआर्मध्ये मुख्य संशयित आरोपी म्हणून संभाजी भिडे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवूनही त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्रावर द्या, असे निर्देश ७ मार्च या दिवशी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले असून पुढील सुनावणी १६ एप्रिलला ठेवली आहे. जानेवारी २०१८ मध्ये कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी अनिता सावळे यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.


Multi Language |Offline reading | PDF