२० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त

नवी देहली – २० लाख रुपयांपर्यंत मिळणार्‍या ग्रॅच्युइटीवर (सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणार्‍या पैशांवर) आता कोणताही कर आकारला जाणार नाही, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे. ग्रॅच्युइटी कायद्याच्या अंतर्गत न येणार्‍या कर्मचार्‍यांनाही हा निर्णय लागू होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाची कार्यवाही कोणत्या दिनांकापासून करण्यात येईल, हे मात्र सांगण्यात आलेले नाही. आतापर्यंत १० लाख रुपयांंपर्यंत मिळणारी ग्रॅच्युइटी करमुक्त होती.


Multi Language |Offline reading | PDF