निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत राजकारणात येणार नाही ! – रॉबर्ट वाड्रा

नवी देहली – मी या देशात रहातो. ज्यांनी या देशाला लुटले, ते देशाबाहेर पळून गेले. त्यांचे काय ? मी भारत सोडून कधीच जाणार नाही, तसेच माझी चौकशी पूर्ण होईपर्यंत मी सक्रीय राजकारणातही येणार नाही, हा माझा शब्द आहे, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले आहे. रॉबर्ट वाड्रा यांची आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी चौकशी चालू आहे. काही दिवासांपूर्वी त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते.

काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील मोरादाबाद येथे वाड्रा यांचे छायाचित्र असलेली भित्तीपत्रके लावण्यात आली होती. त्यावर ‘निवडणूक लढण्यासाठी स्वागत असो’, असे लिखाण करण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF