अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील पार्थ बहुगुणे अपहरण प्रकरणातील ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा !

अमळनेर (जिल्हा जळगाव) – पार्थ बहुगुणे अपहरण प्रकरणातील ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आधुनिक वैद्य निखील बहुगुणे यांचा मुलगा पार्थ हा ३ जानेवारी २०१७ या दिवशी सायंकाळी शिकवणीसाठी गेला असतांना रात्री ८.३० वाजता ६ आरोपींनी ५० लक्ष रुपयांच्या खंडणीसाठी त्याचे ग्लोबल स्कूल जवळून अपहरण केले होते. पोलिसांच्या भीतीने आरोपींनी अमळगाव येथील पुलावर पार्थ याला एकट्यालाच सोडून पळ काढला होता. आधुनिक वैद्य बहुगुणे यांनी ४ जानेवारी २०१७ या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.


Multi Language |Offline reading | PDF