लंडनमधील हिथ्रो विमानतळासह ३ ठिकाणी स्फोटकांचे टपाल सापडले !

लंडन – येथील हिथ्रो विमानतळ, वॉटर्लू मेट्रो स्थानक आणि लंडन सिटी विमानतळ या ठिकाणी स्फोटकांचे पार्सल सापडल्याने स्कॉटलंड यार्ड आतंकवादविरोधी विभागाने संपूर्ण देशभरात शोधमोहीम हाती घेतली आहे. हिथ्रो विमानतळाच्या टपाल विभागात ५ मार्चला सकाळी एक पुडके आले. ते उघडताच त्याने पेट घेतला. या पाकिटात छोटी ‘आयईडी’ स्फोटके असल्याचे आढळले. त्याची तीव्रता अधिक नव्हती. याच प्रकारचे टपाल लंडनमधील प्रचंड गर्दीचे वॉटर्लू मेट्रो स्थानक, तसेच लंडन सिटी विमानतळावरही आल्याने तेथेही सावधगिरीची चेतावणी देण्यात आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now