कोलवाळ (गोवा) कारागृहात बंदीवानांना मिळतात अमली पदार्थ, मद्य, सिगारेट, स्मार्ट फोन आदी पंचतारांकित सुविधा !

पोलीस कर्मचारीच सुविधा पुरवत असल्याचा संशय

अशी निरर्थक लोकशाही काय कामाची ?

पणजी, ७ मार्च (वार्ता.) – कोलवाळ येथील कारागृहात बंदीवानांना (कैद्यांना) अमली पदार्थ, मद्य, सिगारेट, स्मार्ट फोन आदी पंचतारांकित सुविधा मिळत असल्याची माहिती उघड झाली आहे. ‘प्रूडंट मीडिया’ या वृत्तवाहिनीने हे विशेष वृत्त प्रसारित केले आहे.

या वृत्तात म्हटले आहे की, कोलवाळ येथील कारागृहात ४२९ बंदीवान आहेत, तर  सुमारे ४०० भ्रमणभाष आहेत. बंदीवानांकडे सर्वसाधारण भ्रमणभाष नव्हे, तर ‘स्मार्ट फोन’ आहेत. त्यांना अमली पदार्थ, मद्य, सिगारेट, आदी दिले जाते. विशेष म्हणजे त्यांना तेथील पोलीस कर्मचारीच या सुविधा पुरवत आहेत. (कारागृहरक्षक किंवा पोलीस यांचे साटेलोटे असल्याविना बंदीवानांना आलीशान सुविधा कशा मिळणार ? सामान्य नागरिकालाही हे समजेल; पण शासनाला हे समजत नाही, हे दुर्दैव ! – संपादक) कारागृहात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आकस्मिक भेटीविषयीसुद्धा बंदीवानांना पूर्वकल्पना दिली जाते. आकस्मिक भेटीविषयी पूर्वकल्पना मिळाल्याने संबंधित बंदीवान त्याच्याकडील ‘आलिशान’ सुविधा लपवून ठेवू शकतो.


Multi Language |Offline reading | PDF