५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सोलापूर येथील कु. वेदा विजय जोशी (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !

कु. वेदा जोशी

१. गर्भधारणा झाल्याची निश्‍चिती नसतांनाही ‘गर्भाला सेवाकेंद्रातील चैतन्य मिळू दे’, अशी प्रार्थना झाल्याने आश्‍चर्य वाटणे अन् सोनोग्राफी केल्यावर गर्भधारणा झाल्याचे कळणे

‘वेदाच्या जन्मापूर्वी मला ध्वनीचित्र-चकत्या मोजण्याची सेवा मिळाली होती. मी सेवाकेंद्रात सेवेला गेले आणि पहिल्याच दिवशी माझ्याकडून आपोआप प्रार्थना झाली, ‘माझ्या गर्भातील बाळाला आणि मला येथील चैतन्य अन् सात्त्विकता यांचा लाभ मिळू दे.’ त्या वेळी मला स्वतःलाच आश्‍चर्य वाटले की, मी अशी प्रार्थना कशी काय केली ? नंतर मला रक्तस्राव होऊ लागला; पण मला स्वतःला जाणवत होते की, मला दिवस गेले आहेत. नंतर आधुनिक वैद्यांना दाखवल्यानंतर त्यांनी सोनोग्राफी करून गर्भ असल्याचे सांगितले.

२. सात्त्विकतेची आवड

२ अ. ‘प.पू. गुरुदेवांना केस कापलेले आवडत नाहीत’, असे सांगितल्यावर तिने केस कधीच कापले नाहीत. तिला दोन वेण्या घालायला आवडतात.

३. साधनेचे गांभीर्य

३ अ. सेवेत सहभागी होणे : ती दिंडीच्या सेवेत सहभागी झाली. ती आतापर्यंत दोन वेळा ‘झाशीची राणी’ झाली आहे. प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी तिने शांतपणे सर्व कार्यक्रम पाहिले. एका साधिकेने मला सांगितले, ‘‘तुमची मुलगी शांत आणि सात्त्विक आहे.’’

३ आ. चुकीविषयी खंत वाटणे : वेदाला ‘असे वागणे वाईट आहे. प.पू. गुरुदेवांना अशी मुले आवडत नाही’, असे सांगितल्यावर ती लगेच क्षमा मागते आणि परत ती चूक होणार नाही, याची काळजी घेते.

३ इ. साधनेचे प्रयत्न वाढवणे : वेदा आणि कु. सृष्टी सचिन देवडीकर (वय ९ वर्षे) या दोघींची दिंडीच्या वेळी पुष्कळ मैत्री झाली. नंतर सृष्टीची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यावर मी वेदाला तिने केलेल्या प्रयत्नांविषयी सांगितले. त्या वेळी वेदा म्हणाली, ‘‘मीही आजपासून हे सर्व प्रयत्न करीन.’’ आता ती तसे प्रयत्न करते.

३ ई. आत्मनिवेदन करणे : एकदा मी वेदाला सांगितले, ‘‘तुला कोणाचे वागणे आवडले नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा राग आला, तर ते सर्व गुरुदेवांना सांगायचे.’’ तेव्हापासून ती तसे करते. तिच्याकडून काही चूक झाली, तर ती पत्र लिहिते आणि ते गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर ठेवून प्रार्थना करते

– सौ. वंदना विजय जोशी, सोलापूर (ऑक्टोबर २०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now