‘हिंदुस्थान युनिलिव्हर’कडून ट्वीटद्वारे कुंभमेळ्याचा अवमान

हिंदूंच्या विरोधानंतर ट्वीट हटवले !

हिंदूंनी आता अशा विदेशी आस्थापनांच्या उत्पादनांवर बहिष्कार घालणे, हीच खरी देशभक्ती होय !

नवी देहली – ‘कुंभमेळा असे ठिकाण आहे, जिथे वयोवृद्धांना सोडले जाते. आपण आपल्या लोकांची साथ सोडतो, हे दु:खद नाही का ? ज्यांच्यामुळे आज आम्ही आहोत, अशा व्यक्तींना साथ देण्यासाठी #RedLabel आम्हाला प्रेरणा देतो’, असे म्हणत एक ध्वनीचित्रफीत ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ या विदेशी आस्थापनाने ट्विटर अकाऊंटवरून प्रसारित केली होती. याला हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर आणि त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यावर आस्थापनाने ते ट्वीट हटवून ‘ज्यांच्यामुळे आज आम्ही आहोत, अशा लोकांचा हात पडकण्यासाठी रेड लेबल चहा आम्हाला प्रेरणा देतो’, असे ट्वीट करण्यात आले.

विदेशी आस्थापनांना इंग्रजांप्रमाणे देशातून हाकला ! – योगऋषि रामदेव बाबा

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ने हिंदु धर्म आणि संस्कृती यांची थट्टा केली आहे. आपल्यासाठी देश हा परिवार आहे; पण हिंदुस्थान युनिलिव्हरसाठी आपला देश म्हणजे केवळ एक बाजार आहे. आजही देशातील ५० लाख कोटी रुपयांच्या अर्थव्यवस्थेवर या विदेशी आस्थापनांचे वर्चस्व आहे. अशा विदेशी आस्थापनांना इंग्रजाप्रमाणे भारतातून हद्दपार करण्याचा आपण संकल्प केला पाहिजे, असे ट्वीट योगऋषि रामदेव बाबा यांनी केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now