पाककडून १८२ मदरसे नियंत्रणात, तर १०० आतंकवादी अटकेत

  • केवळ अटक नको, तर त्यांना फाशी देण्याचे धाडस पाकिस्तान दाखवणार का ?
  • मसूद अझहर, हाफिज सईद, दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आदी आतंकवाद्यांना अटक करून त्यांना फाशी कधी देणार ?
  • पाकमधील सर्व आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे कधी बंद करणार ?
  • आयएस्आय ही आतंकवादी गुप्तचर संस्था बंद कधी करणार ?

इस्लामाबाद – पाकिस्तानी सरकारने १८२ मदरसे नियंत्रणात घेण्यासह बंदी घातलेल्या संघटनांशी संबधित असलेल्या १०० आतंकवाद्यांना अटक केल्याची घोषणा केली आहे. पुलवामा येथील आक्रमणानंतर पाकवर जागतिक स्तरावरून दबाव वाढत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पाकच्या गृह मंत्रालयाने सांगितले. यासह १२१ समाजकंटकांना प्रतिबंधित कारवाई म्हणून अटक करण्यात आल्याचेही मंत्रालयाने सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now