(म्हणे) ‘मोदी पुन्हा निवडून आले, तर पुतीन यांच्याप्रमाणे विरोधकांना संपवतील !’

  • आतंकवाद्यांवरील आक्रमणाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणार्‍यांनी कधी ‘लव्ह जिहाद’, गोहत्या, काश्मिरी पंडितांचे विस्थापन, समान नागरी कायदा, ३७० कलम यांविषयी कधी चर्चेचे आयोजन केले आहे का ?
  • देशाला मेटाकुटीला आणणार्‍या पाकपुरस्कृत धर्मांधांच्या कारवाया आणि इस्लामी आतंकवाद यांविषयी मूग गिळून गप्प रहाणारे निखिल वागळे यांचा मोदीद्वेष !

मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – मोदी म्हणतात ‘घर में घुसके मारेंगे ।’ गावात दादागिरी करणारेही असे बोलत नाहीत. (असे म्हटल्याने प्रतिदिन आतंकवाद्यांच्या हातून मारणार्‍या सैनिकांचा घोर अवमानच होत आहे ! – संपादक) मोदी पंतप्रधान झाले; मात्र संस्कार नाहीत. मनमोहन सिंह आणि वाजपेयी यांच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाले; मात्र त्यांनी त्याची प्रसिद्धी केली नाही. मोदी यांना आताच रोखले नाही, तर भारताची स्थिती रशियासारखी होईल. रशियात पुतीन यांनी विरोधकांना संपवून टाकले. मोदी पुन्हा निवडून आले, तर पुतीनप्रमाणे विरोधकांना संपवतील, असे वक्तव्य पत्रकार निखिल वागळे यांनी केले. ६ मार्च या दिवशी ‘जय जवान जय किसान’ आणि ‘भारत बचाओ आंदोलन’ यांच्या वतीने दादर येथील शिवाजी मंदिर येथे ‘पुलवामा हमला, बालाकोट सर्जिकल स्ट्राईक, राष्ट्रीय सुरक्षा – काही सवाल, काही तथ्य’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, फिरोज मिठीबोरवाला हे उपस्थित होते.

या वेळी वागळे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर ४० वर्षांपर्यंत तिरंगा लावण्यात येत नव्हता; ते काय आम्हाला देशभक्ती शिकवणार ? (मदरशांमध्ये ‘वन्दे मारतम्’ला विरोध होतो, देशातील धर्मांध ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देतात, तेव्हा वागळे यांच्यातील पत्रकार आणि त्यांच्यातील देशप्रेम कुठे जाते ? संघाच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणारे वागळे ‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्‍यांविषयी गप्प रहातात ? – संपादक) आज मोदी देशभक्तीच्या नावावर निवडणूक लढवू पहात आहेत. मृतदेहाच्या टाळूवरील लोणी खाणारा आणि सैनिकांच्या चितेवर स्वत:चे राजकारण करणारा हा पंतप्रधान आहे. (यापूर्वी काँग्रेसने अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि धर्मनिरपेक्षता यांच्या आडून निवडणुका जिंकल्या. आता देशभक्ती आणि पाकिस्तानवरील आक्रमण या सूत्रावर निवडणूक लढवली, तर वागळे यांच्या पोटात का दुखते ? – संपादक)

या देशातील ९९.५ टक्के प्रसारमाध्यमे भ्रष्ट आणि मोदीधार्जिणी झाली आहेत. प्रसारमाध्यमे मोदी यांच्या दबावाखाली काम करत आहेत. (यापूर्वी अनेक वर्षे प्रसारमाध्यमे विदेशी ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या कह्यात होती, तेव्हा वागळे यांची पोपटपंची तिथे चालत असल्याने त्यांना बरे वाटत होते ! आता त्यांना कुठल्याच प्रसारमाध्यमांत स्थान नसल्याने हे सुचत आहे ! – संपादक) मला तुम्ही देशद्रोही म्हणा; मात्र ‘मी हे विश्‍वचि माझे घर’, असे मी मानतो. (हा शोध त्यांना आता लागला का ? – संपादक) पत्रकार म्हणून जे सत्य आहे ते जनतेपर्यंत पोहोचवणे, हे माझे आद्यकर्तव्य आहे. (अल्पसंख्यांकांवरील अन्याय आणि हिंदूंना आतंकवादी ठरवणे, एवढीच वागळे यांची सत्याची संकुचित व्याख्या आहे का ? सत्य पत्रकारितेविषयी गप्पा मारणार्‍या निखिल वागळे यांना या देशातील बहुसंख्य हिंदूंवर होत असलेला अन्याय दिसत नाही का ? – संपादक)

(म्हणे) ‘मोदी निवडणुकीसाठी देशात आतंकवाद निर्माण करत आहेत !’ – ब्रिगेडिअर सुधीर सावंत

आतंकवादी कोण आहेत हे माहीत असणारे सुधीर सावंत यांचे हे वक्तव्य ब्रिगेडिअर पदाला शोभणारे आहे का ?

२०१४ पर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होऊन तेथे शांततामय वातावरण निर्माण झाले होते. काश्मीरमध्ये आतंकवादाला चालना देण्यासाठीच मुफ्ती मेहबूबा आणि भाजप यांची युती झाली. या दोघांनी एकत्रित आतंकवाद निर्माण केला आहे. पुलवामा येथील आक्रमणाचे मोदी राजकारण करत आहेत. यांना संविधान पालटायचे आहे. मोदी आतंकवाद निर्माण व्हावा, यासाठी स्थानिकांना साहाय्य करत आहेत.

(म्हणे) ‘काश्मीरमधील लोकांशी प्रेमाने बोललात, तर ते आपले होऊन जातील !’ – पत्रकार जतीन देसाई

सैनिकांवर दगडफेक होऊनही दगडफेक्यांवर कारवाई केली जात नाही. अजून काश्मिरींवर किती प्रेम करायचे ?

पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘घरात घुसून मारू.’ गल्लीतील राजकारणीसुद्धा असे शब्द वापरत नाहीत. (भारताचे मीठ खाऊन शत्रूराष्ट्राशी निष्ठा दाखवणार्‍या अशा पत्रकारांना आता देशभक्तच जाब विचारतील, असे वाटते ! – संपादक) काश्मीरमधील लोकांशी दोन शब्द प्रेमाने बोललात, तर ते आपले होऊन जातील. आज अशाच शब्दांची आवश्यकता आहे. आपणाला युद्ध पाहिजे आहे कि ‘बुद्ध’ पाहिजे, ते निश्‍चित करायला हवे. (पाकिस्तानने आतापर्यंत भारतावर ३ वेळा आक्रमण करून आणि प्रतिदिन आतंकवादी आक्रमणे करून सहस्रावधी सैनिक आणि देशवासीय यांना मारले आहे. त्यामुळे जतीन देसाई यांनी शांतीच्या गोष्टी भारताला सांगण्यापेक्षा आतंकवाद्यांना जाऊन सांगाव्यात. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF