पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांच्या समर्थनासाठी १० मार्चला दादर येथे विशाल मौन पदयात्रा !

मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व देश-विदेशापर्यंत पोहोचवणारे आणि तिच्या संवर्धनासाठी कार्यरत पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मागील ६ वर्षांपासून त्यांना कारागृहात ठेवण्यात आले असून जामीनही संमत करण्यात आलेला नाही. त्यांच्यावरील या अन्यायाचे निष्पक्षपणे अन्वेषण होऊन त्यांची निर्दोष मुक्तता व्हावी आणि त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांचे भक्त आणि संस्कृतीरक्षणासाठी कार्यरत असलेल्या विविध संघटना यांच्या वतीने १० मार्च या दिवशी एक अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंतर्गत या दिवशी दादर येथे विशाल मौन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दादर (पश्‍चिम) येथील शिवाजी पार्क येथील श्री गणेश मंदिराच्या येथून दुपारी २ वाजता या पदयात्रेला प्रारंभ होणार असून वरळी येथील आदर्शनगर स्पोर्ट्स मैदानावर त्याची सांगता होणार आहे.

या अभियानाच्या अंतर्गत पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांचे भारतीय संस्कृतीरक्षणाचे कार्य आणि त्यांच्यावरील आरोपांमागील सत्य लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी या दिवशी सामाजिक प्रसारमाध्यमांवर मोहीम राबवण्यात येणार आहे. याविषयी पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांचे भक्त म्हणाले, ‘‘हिंदुद्वेष्ट्या पुरोगामी मंडळींकडून हिंदु धर्म आणि संत यांवर सातत्याने चिखलफेक करण्यात येत आहे. हे हिंदु धर्म आणि संत यांना अपकीर्त करण्यासाठी रचलेले षड्यंत्र आहे. या सर्व गोष्टींचा सनदशीर मार्गाने आणि संघटितपणे विरोध करण्यासाठी या पदयात्रेत विविध संघटना अन् विविध क्षेत्रांतील बंधू-भगिनी यांनी सहभागी व्हावे. याविषयी अधिक माहिती हवी असल्यास ९७६८१७५२८२ या क्रमांकावर संपर्क करावा.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now