कल्याण येथे काही डबे मागे ठेवून पुढे गेली पंचवटी एक्सप्रेस !

रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा सामान्य नागरिकांना फटका !

कल्याण, ७ मार्च (वार्ता.) – येथे कपलिंग तुटल्यामुळे मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस काही डबे मागे ठेवून धावल्याचा धक्कादायक प्रकार ७ मार्चला सकाळी घडला. कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान पत्रीपूल परिसरात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे ऐन सकाळच्या वेळी जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून त्याचा धीम्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. मनमाडहून मुंबईला जाणार्‍या पंचवटी एक्सप्रेसने कल्याण स्थानक सोडले आणि गाडी पत्रीपूल परिसरात आली; मात्र पत्रीपूल ओलांडताच कपलिंग तुटल्याने इंजिनसह २ डबे पुढे गेले आणि उर्वरित गाडीचे डबे पाठीमागेच राहिले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या प्रकाराने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने गाडी थांबवली.


Multi Language |Offline reading | PDF