वायूप्रदूषणामुळे जगभरात ७० लाख लोकांचा मृत्यू ! – संयुक्त राष्ट्र

मृत झालेल्यांमध्ये ६ लाख मुलांचा समावेश

  • विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा परिणाम !
  • विज्ञानाने लावलेल्या शोधांच्या पूर्वी या पृथ्वीवर वायूप्रदूषण नावाची समस्या कधी होती का ?

जिनेव्हा – घर आणि घराबाहेरील वायूप्रदूषणामुळे प्रत्येक वर्षी ७० लाख लोकांचा मृत्यू होत असतो. यात ६ लाख मुलांचा समावेश आहे, अशी माहिती पर्यावरण आणि मानवाधिकार यांविषयीचे संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत डेविड आर्. बॉयड यांनी दिली आहे. ते येथे मानवाधिकार परिषदेमध्ये बोलत होते.

बॉयड पुढे म्हणाले की,

१. ६०० कोटी लोक अशा प्रदूषित हवेमध्ये श्‍वास घेतात. त्यामुळे त्यांचे जीवन आणि आरोग्य संकटात येत आहे. यात एक तृतीयांश लहान मुलांचा समावेश आहे.

२. अनेक वर्षे प्रदूषित हवेमध्ये श्‍वास घेतल्याने कर्करोग, श्‍वासाच्या संदर्भातील आजार आणि हृदयरोग होतात. यामुळे प्रत्येक घंट्याला ८०० जणांचा मृत्यू होतो. तरीही या समस्येकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नाही.

३. वायप्रदूषण रोखता येऊ शकते. या संदर्भातील कायद्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. काही चांगल्या परंपरांचे पालन केल्यानेही ते अल्प होऊ शकते. भारत आणि इंडोनेशियामध्ये असा प्रयत्न केला जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF