बांगलादेशमध्ये जिहाद्यांकडून अल्पसंख्यांक हिंदूंचा अनन्वित छळ

बांगलादेश राष्ट्रीय हिंदु महाआघाडीकडून ढाका येथे मानवी साखळीद्वारे निषेध

  • हिंदु राष्ट्रात अन्य देशांतील हिंदूंवर अत्याचार होऊ नयेत यासाठी उपाययोजना केली जाईल !
  • बांगलादेशातील हिंदूंवर भारताच्या फाळणीपासूनच अत्याचार होत आहेत; मात्र गेल्या ७१ वर्षांत भारतातील एकाही शासनकर्त्याने याविषयी आवाज उठवला नाही कि तथाकथित मानवाधिकार संघटनांनीही लक्ष दिले नाही. ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !

ढाका – मुसलमानबहुल बांगलादेशामध्ये जिहाद्यांकडून अल्पसंख्यांक हिंदूंचा अनन्वित छळ चालू आहे. बांगलादेशातील धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंदूंवरील या अत्याचाराच्या निषेधार्थ बांगलादेश राष्ट्रीय हिंदु महाआघाडीने ढाका शहरात मानवी साखळीच्या माध्यमातून नुकताच निषेध व्यक्त केला.

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगच्या राजवटीत अल्पसंख्यांक हिंदूंवरील आक्रमणांच्या घटनांनी परिसीमा गाठली आहे. हल्लीच ‘बांगलादेश हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती ऐक्य परिषदे’च्या संयोजक सचिव प्रियाबाला साहा, बांगलादेश मुक्तीलढ्यातील वीर जगदीश बिस्वास, बांगलादेश राष्ट्रीय हिंदु महाआघाडीच्या अध्यक्षा श्रीमती प्रीतीलता बिस्वास यांच्यासह इतर अनेक हिंदूंच्या घरांवर आक्रमण करून ती पेटवण्यात आली होती. तसेच अल्पसंख्यांक हिंदूंवर बलात्कार, लैंगिक शोषण, अपहरण, हत्या, जाळपोळ, हिंदूंच्या मंदिरांची नासधूस इत्यादी घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. याविषयी या वेळी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF