जीवनातील समस्यांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

व्याख्यानाला उपस्थित धर्माभिमानी हिंदू

कर्जत (रायगड), ६ मार्च (वार्ता.) – जीवनात धर्मशिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे; मात्र हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्थाच उपलब्ध नाही. परिणामस्वरूप आज हिंदू धर्माचरण करत नाहीत. जीवनातील समस्यांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक आहे. धर्मग्रंथांत याविषयी मार्गदर्शन केले आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. २८ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता येथील ग्रामदैवत धापया मंदिराच्या सभागृहात व्याख्यान घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ६१ धर्माभिमानी हिंदूंनी याचा लाभ घेतला.

सहकार्य

१. कर्जतचे नगरसेवक श्री. महेंद्र चंदने यांनी मंदिराचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.

२. भिसेगाव येथील सनातनचे वाचक आणि धर्माभिमानी श्री. अमोल हजारे यांनी चार दिवसांसाठीच्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था केली.

वैशिष्ट्यपूर्ण

श्री. अभिनव कोडगिरे यांच्या पत्नीचे केवळ काही घंट्यांनी शस्त्रकर्म असूनही ते या व्याख्यानाला शेवटपर्यंत उपस्थित राहिले. ‘मी शाळांमध्ये क्रांतीकारकांच्या फलकांचे प्रदर्शन लावण्यासाठी साहाय्य करीन’, असेही त्यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF