पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणार्‍या धर्मांधास अटक

शत्रूराष्ट्राच्या समर्थनार्थ घोषणा देण्याचे धर्मांधांचे धाडस होणे, हे सरकारला लज्जास्पद ! बेळगावला ‘पाकिस्तान’ बनवू पहाणार्‍यांवर पोलीस आणि शासनकर्ते त्वरित कठोर कारवाई करतील का ?

बेळगाव – येथील कामत गल्ली परिसरात ३ मार्च या दिवशी फटाके फोडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा देणार्‍या आयुब बशीर मुल्ला (वय १९ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. अन्य एक संशयित आरोपी महंमदसहेफ आयुब पटेल रुग्णालयात भरती असून उपचाराअंती त्यालाही अटक करण्यात येणार आहे. या प्रकरणात अद्याप ३ संशयित धर्मांध पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ३ मार्चला झालेल्या या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने पाठलाग करून मुल्ला आणि महंमदसहेफ यांना चोप दिला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now