महाशिवरात्रीनिमित्त पुणे येथील दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड

धर्मशिक्षणाच्या अभावी देवतांचा कलाकृती म्हणून वापर !

पुणे – कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड, मुखवटा आणि फळा-फुलांची आरास करण्यात आली होती. (देवतेच्या मूळ रूपामध्ये चैतन्य असते. चक्क्याच्या शिवपिंडीला कोणताही शास्त्राधार नाही. हिंदूंनी कलाकुसरीमध्ये वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ देवाच्या उपासनेसाठी दिला, तर आध्यात्मिक लाभ होईल. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF