(म्हणे) ‘कपाळावर कुंकवाचा टिळा आणि भस्म लावणार्‍यांची भीती वाटते !’ – कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  • टिळा आणि भस्म लावल्याने वाढलेल्या सात्त्विकतेचा तमप्रधान व्यक्तींना त्रास होतो, हेच यातून लक्षात येते !
  • गेल्या २ वर्षांपासून राहुल गांधी कपाळावर टिळा लावून हिंदूंच्या मंदिरात जातात त्याची भीती सिद्धरामय्या यांना वाटत नाही का ?
  • राहुल गांधी आता सिद्धरामय्या यांच्यावर कारवाई करणार आहेत कि ते स्वतःच्या कपाळावर कुंकू किंवा भस्म लावण्याचे बंद करणार आहेत, हे त्यांनी हिंदूंना सांगावे !

बेंगळूरू – ‘कुंकवाचा टिळा आणि भस्म लावणार्‍या लोकांची मला भीती वाटते’, असे विधान काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील बदामी येथील एका कार्यक्रमात केले. कर्नाटकात लिंगायत समाजाचा प्रभाव असून कपाळावर भस्म लावणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.


Multi Language |Offline reading | PDF