घरभेद्यांचा नि:पात केव्हा ?

कांजिवरा (रत्नागिरी) येथील मदरशातून धर्मांधांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचे वृत्त ताजे असतांनाच बेळगाव येथेही असाच संतापजनक प्रकार घडला आहे. बेळगाव येथील कामत गल्लीत ३ मार्चला ४ धर्मांधांनी फटाके फोडत पाकच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. पुलवामा येथील आक्रमणानंतर एकीकडे भारत-पाक यांच्यात युद्धजन्य स्थिती आहे, तर दुसरीकडे हे देशद्रोही त्याच शत्रूराष्ट्राचे गोडवे गात आहेत. उद्या प्रत्यक्ष युद्धाची वेळ येईल, तेव्हा हेच घरभेदी हाती शस्त्र घेऊन स्वदेशाविरुद्धच उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वीच मुंब्रा, संभाजीनगर येथील इसिसच्या समर्थकांकडून काश्मीर येथील आतंकवाद्यांना आर्थिक पुरवठा होत असल्याचे उघड झाले होते. या सर्वांचा धर्म कोणता, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. असहिष्णुतेच्या नावे गळे काढणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना खरे तर ही सणसणीत चपराक आहे; मात्र जेव्हा धर्मांधांच्या देशद्रोही कारवाया उघड होतात, तेव्हा या मानवतावादी (?) टोळ्या दडी मारून बसतात !

धर्मांध देशद्रोही पाकचे समर्थन करत असतांना राष्ट्रप्रेमी नागरिक त्यांना सतर्क राहून विरोध करत आहेत; मात्र पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यात कुचराई करत आहेत. कांजिवरा (रत्नागिरी) येथील घटनेत ५ ते ६ दिवस उलटून गेले, तरी धर्मांधांवर कारवाई झाली नव्हती. पोलिसांची अशी दिरंगाई चिंताजनक आणि संतापजनक आहे. धर्मांध देशद्रोह्यांपुढे नांगी टाकणारे पोलीस उद्या युद्धस्थितीत नागरिकांचे रक्षण काय करणार ? पुलवामा येथील आक्रमणानंतर भारताने ‘जैश’च्या तळावर केलेल्या कारवाईवरून सध्या राजकारणाला ऊत आला आहे. विरोधक टीकेचे आणि संशयाचे गलिच्छ राजकारण करण्यात, तर सत्ताधारी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात गुंतले आहेत. या स्थितीत देशात निर्माण होत असलेल्या या ‘मिनी पाकिस्तानां’कडे दुर्लक्ष होत आहे. सुरक्षेविषयीचा हा कमालीचा निष्काळजीपणा निषेधार्ह आणि न परवडणारा आहे.

पाकपुरस्कृत आतंकवादाने आतापर्यंत भारताची अपरिमित हानी केली आहे. या आतंकवाद्यांना देशातीलच घरभेद्यांनी अनेकदा साहाय्य केले आहे. उद्या भारत-पाक युद्ध झाल्यावर ठिकठिकाणी ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण करणार्‍या धर्मांध देशद्रोह्यांचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे उघडपणे शत्रूराष्ट्राचे शुभचिंतन करणार्‍या या देशद्रोही पिलावळीचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक आहे. अकार्यक्षम आणि निष्काळजी पोलीस यंत्रणा अन् राजकीय नेते यांना देशाच्या सुरक्षेचे काहीच सुवेरसुतक नाही. देशप्रेमी नागरिकांनी मात्र याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे नागरिकांनी ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण करणारे घरभेदी आणि पाकपुरस्कृत आतंकवाद यांचा कायमचा बीमोड करण्यासाठी सत्ताधार्‍यांवर सातत्याने दबाव आणणेच राष्ट्रहितावह ठरेल !

– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now