मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण दिले, तरच ते धर्माचरण करतील ! – सतीश कोचरेकर, हिंदु जनजागृती समिती

ठाणे, ५ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्वराज्याची शिकवण मिळाली. त्यामुळे ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. आजची पिढी पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत असल्याने वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण दिले, तरच ते धर्माचरण करतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. येथील कोल्हापूर तरुण वीर बजरंग व्यायामशाळेच्या मैदानात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. भाजपच्या नगरसेविका सौ. नंदा पाटील, वि.हिं.प.चे श्री. विक्रम भोईर, कोल्हापूर तरुण वीर बजरंग व्यायामशाळेचे सचिव श्री. चळोबा मांगले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. ८७ हून अधिक धर्मप्रेमींनी सभेचा लाभ घेतला.


Multi Language |Offline reading | PDF