(म्हणे) ‘मला नाही, तर काश्मीरचा प्रश्‍न सोडवणार्‍याला नोबेल द्या !’ –  इम्रान खान

पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरचा प्रश्‍न सोडवून संपूर्ण काश्मीर भारताला जोडण्याचे कार्य केल्यास त्यांना नोबेल पुरस्कार मिळू शकतो, असे कोणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

(चित्रावर क्लिक करा)

इस्लामाबाद – मी नोबेल पुरस्कारासाठी पात्र नाही. काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार काश्मीरचा प्रश्‍न सोडवणार्‍या व्यक्तीला नोबेल पुरस्कार द्यायला हवा. या सूत्रावर तोडगा निघाल्यास या क्षेत्रात शांतता नांदेल आणि विकास होईल, असे ट्वीट पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. (इम्रान यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताच्या कह्यात दिला आणि पाकमधील आतंकवाद्यांवर कारवाई करून त्यांना संपवले, तर त्यांना नक्कीच नोबेल पारितोषिक देण्याची मागणी अनेक जण करतील ! – संपादक)

भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना परत भारताला सोपवल्यानंतर पाकच्या संसदेत इम्रान खान यांना शांततेच नोबल पारितोषिक देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर इम्रान खान यांनी हे म्हटले. (आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अभिनंदन यांना सोडणे पाकला भाग होते आणि म्हणूनच त्याला त्यांना सोडावे लागले आहे, यात इम्रान खान आणि पाक केवळ शांततेचा आव आणत आहेत ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF