काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाला ‘अपघात’ म्हटले !

धर्मांधांचे लांगूलचालन करणारे दिग्विजय सिंह यांचा आतापर्यंतच इतिहास पहाता ते अशा प्रकारची राष्ट्रघातकी विधानेच करत रहाणार आहेत. त्यामुळे भाजप सरकारने त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत आजन्म कारागृहात डांबण्याचे धाडस दाखवावे !

भोपाळ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करून पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाला ‘अपघात’ म्हटले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, पुलवामा अपघातानंतर भारतीय वायूदलाने केलेल्या ‘एअर स्ट्राईक’वर विदेशी प्रसारमाध्यमे शंका घेत आहेत. ज्यामुळे भारत सरकारच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. पंतप्रधान मोदी तुमच्या मंत्रीमंडळातील काही मंत्री ३०० आतंकवादी, भाजपचे अध्यक्ष २५० आतंकवादी, योगी आदित्यनाथ ४०० आतंकवादी मारल्याचे सांगतात, तर तुमचे मंत्री अहलुवालिया ‘एकही आतंकवादी मारला नाही’, असे सांगतात. तुम्ही यावर मौन बाळगले आहे. नेमके खोटे कोण बोलत आहे, ते देशाला कळले पाहिजे.

पुलवामा आक्रमण ‘अपघात होता’, तर राजीव गांधी यांची हत्याही ‘अपघात’च होता का  – भाजपचे मंत्री व्ही.के. सिंह यांचा प्रश्‍न

नवी देहली – पुलवामा आक्रमण हा अपघात होता, तर राजीव गांधी यांची हत्या ही आतंकवाद्यांनी केलेली कारवाई होती कि तोही अपघात होता?, असा प्रश्‍न मला दिग्विजय सिंह यांना विचारावासा वाटतो,’ असे केंद्रीयमंत्री व्ही.के. सिंह यांनी विचारला आहे. ‘राजीव गांधी यांच्याविषयी पूर्णपणे आदर बाळगून मी हा प्रश्‍न विचारत आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एअर स्ट्राईकमध्ये २५० आतंकवादी ठार !

व्ही.के. सिंह यांनी केंद्र सरकारची बाजू स्पष्ट करतांना सांगितले की,  बालाकोटवरील एअर स्ट्राईकमध्ये २५० आतंकवाद्यांना ठार करण्यात आल्याची आकडेवारी केवळ एकाच ठिकाणी आहे. ती इतरत्र कुठेही नाही. वायूदलाने त्यांचे लक्ष्य अतिशय काळजीपूर्वक निवडले होते. ते लक्ष्य नागरी वस्तीपासून दूर होते. त्यामुळे या आक्रमणाची झळ नागरिकांना बसली नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now