भारताने अजमेर दर्ग्याला भेट देणार्‍या यात्रेकरूंना व्हिसा नाकारला ! – पाकच्या मंत्र्यांचा आरोप

यात्रेच्या नावाखाली पाक हेरगिरी करत आहे, असे सरकारला वाटल्याने ते नाकारण्याचा अधिकार भारताला आहे, हे पाकने लक्षात ठेवावे !

इस्लामाबाद – भारताने अजमेर येथील मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट देण्यासाठी जाऊ पहाणार्‍या पाकिस्तानच्या ५०० नागरिकांना व्हिसा देण्यास नकार दिला आहे, असा आरोप पाकचे धार्मिक विभागाचे मंत्री पीर नूर-उल्-हक कादरी यांनी केला आहे. भारतीय दूतावासाने या नागरिकांचे पारपत्रही परत दिलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला. कादरी पुढे म्हणाले की, पाकिस्तानने एका वर्षांत ५ सहस्र ६०० शीख यात्रेकरूंना, तर ३१२ हिंदु यात्रेकरूंना व्हिसा दिला आहे. (हे यात्रेकरूच असल्याने पाकने त्यांना व्हिसा दिला होता अन्यथा पाकनेही तो नाकारला असता ! – संपादक)

अजमेर दर्ग्याच्या प्रमुख दिवाणांकडून पाकच्या यात्रेकरूंवर बंदी घालण्याची मागणी

भारताला अशा देशभक्त आणि उघडपणे पाकविरोधात बोलणार्‍या मुसलमानांची आवश्यकता आहे !

अजमेर शरीफ दर्ग्याचे प्रमुख दिवाण सैय्यद जैनुल आबेदीन अली खान यांनी पुलवामा येथील आक्रमणानंतर म्हटले होते की, भारताने प्रतिवर्षी येथे उरूससाठी येणार्‍या पाक नागरिकांना रोखावे; कारण यात्रेच्या निमित्ताने पाक त्यांच्या हेरांना आणि हस्तकांना पाठवून भारताच्या विरोधातील माहिती गोळा करतो. ही माहिती देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असते. (अजमेर दर्ग्याच्या दिवाणांना जे लक्षात येते, ते भारतातील राजकीय पक्षांच्या नेत्यांना लक्षात येत नाही का ? तथाकथित पुरोगामी, निधर्मीवादी, पाकप्रेमी यांना हे लक्षात येत नाही कि ते लक्षात येऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF