पुणे येथे महाशिवरात्रीनिमित्त २५ टक्के अतिरिक्त दराने बससेवा

पुणे परिवहन महामंडळाचा तुघलकी कारभार !

पुणे – महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने स्वारगेट ते बनेश्‍वर आणि धायरेश्‍वर, नेहरू स्टेडियम ते नीलकंठेश्‍वर आणि मनपा ते सोमेश्‍वरवाडी या मार्गांवर अतिरिक्त बससेवा चालू करण्यात आली होती. या मार्गांवर विशेष बससेवा पुरवत असल्याचे सांगत प्रवाशांसाठी नेहमीच्या दरापेक्षा २५ टक्के अतिरिक्त दराने तिकीट आकारण्यात आले. या मार्गांवर एक दिवसीय, साप्ताहिक, पाक्षिक, तसेच मासिक पासधारकांना सवलतीची मुभा देण्यात आली नव्हती. (एकीकडे हज यात्रेसाठी विविध सवलती द्यायच्या; मात्र हिंदूंच्या यात्रा-उत्सवाच्या निमित्ताने दरवाढ करून त्यांना लुटायचे, हा कुठला सर्वधर्मसमभाव ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now