आतंकवादी मसूद अझहरच्या २ भावांसह ४४ जणांना पाकमध्ये अटक

पाकने केवळ अटक करण्याचे नाटक करू नये, तर त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशी होण्यासाठी प्रयत्न करावेत ! त्यासाठी भारतानेही पाकवर सर्व स्तरांहून दबाव आणावा !

इस्लामाबाद – जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याचे २ भाऊ मुफ्ती अब्दुल रौफ आणि हम्माद अझहर यांच्यासह ४४ जणांना पाकमध्ये अटक करण्यात आली आहे. पाकचे मंत्री शहरयार आफ्रिदी यांनी ही माहिती दिली. ही कारवाई कोणाच्याही दबावामुळे केलेली नाही. ही कारवाई बंदी घातलेल्या संघटनांवर करण्यात आली आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. पुलवामा प्रकरणी भारताने सोपवलेल्या पुराव्यांमध्ये मसूदच्या या २ भावांचे नाव होते, हे त्यांनी मान्य केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now