श्योपूर (मध्यप्रदेश) येथे शिवमंदिरामधील हिंदुत्वनिष्ठांवर धर्मांधांकडून दगडफेक

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांनाही हिंदूंवर आक्रमण होत होते आणि आता काँग्रेसचे सरकार असतांनाही ते होणे स्वाभाविक असल्याने आता ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

श्योपूर (मध्यप्रदेश) – ४ मार्च या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त शिव विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यासाठी येथील सोनेश्‍वर महादेव मंदिरापर्यंत  शिव वरात काढण्यात येते. यासाठी या प्राचीन मंदिराच्या दरवाजावर स्वागताचे लिखाण करण्यात आले होते. पुरातन मंदिरावर लिखाण केल्यावरून ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’चे (‘एसडीपीआय’चे) येथील जिल्हाध्यक्ष नजम इकबाल यांनी पोलिसांत तक्रार केली. (हिंदूंच्या मंदिरावर हिंदूंनी काय करावे आणि काय करू नये, हे सांगण्याचा इकबाल यांना काय अधिकार ? – संपादक) यामुळे येथे तणाव निर्माण झाला. भाजपचे पदाधिकारी, तसेच विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करून इकबाल यांच्या अटकेची मागणी केली.

एक घंटा आंदोलन केल्यावर हे कार्यकर्ते मंदिरामध्ये गेले. तेव्हा त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यात एक हिंदु घायाळ झाला. हिंदूंनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला; मात्र पोलिसांनी प्रसारमाध्यमांना कोणावर गुन्हा नोंदवला आहे, याची माहिती दिली नाही. (धर्मांधांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसच्या राज्यातील हिंदुद्रोही पोलीस ! – संपादक) तसेच या संघटनांनी ‘जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत येथे महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाणार नाही’, अशी चेतावणी पोलिसांना दिली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now