एअर इंडियाच्या विमानात कर्मचार्‍यांना उद्घोषणेच्या वेळी ‘जय हिंद’ म्हणण्याच्या नव्या नियमास मेहबूबा मुफ्ती यांचा विरोध !

‘जय हिंद’ला विरोध करणार्‍या आणि आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍या मेहबूबा मुफ्ती यांना भाजप सरकार कारागृहात डांबण्याचे धाडस दाखवत नाही; मात्र त्यांच्यासमवेत युती करून सत्तेत मात्र सहभागी होतो !

श्रीनगर – एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांना प्रत्येक विमान उड्डाणाची घोषणा करतांना, तसेच विमानांमध्ये प्रथम ‘जय हिंद’ म्हणावे लागणार आहे, अशी माहिती एअर इंडियाचे संचालक (ऑपरेशन्स) अमिताभ सिंह यांनी दिली. यावर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी टीका केली आहे. त्यंनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘मला थोडा आश्‍चर्याचा धक्का बसला आहे; कारण सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर सरकारचा देशभक्तीचा जोश एवढा वाढला आहे की, आकाशालादेखील सोडले नाही.’


Multi Language |Offline reading | PDF