मुंबईमध्ये विविध वाहतूक सेवांसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली आणणार ! – मुख्यमंत्री


मुंबई –
येत्या काळात मुंबईमध्ये प्रवास करतांना विविध वाहतूक सेवांसाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याची आवश्यकता उरणार नाही. पुढील वर्षापर्यंत उपनगरी रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वे यांच्यासह अन्य परिवहन सेवांसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली आणण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ३ मार्च या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे परळ टर्मिनससह विविध रेल्वे सुविधांचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उपनगरीय रेल्वेसेवेचा विस्तार मुरबाड आणि अलिबाग येथपर्यंत करण्याची योजना मध्य रेल्वे प्रशासनाने आखली आहे. पेण ते अलिबाग कॉरीडोरचे काम गतीमान करण्यात येत आहे. तसेच कल्याण ते मुरबाड या मार्गाला रेल्वेमंत्रालयाची अनुमती मिळाली आहे. पश्‍चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांसाठी आणखी १८० सरकते जिने संमत करण्यात आले आहेत. यासह बदलापूर ते अंबरनाथ या रेल्वेस्थानकांच्या मध्ये चिखलोली हे नवीन रेल्वेस्थानक संमत करण्यात आले आहे. धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासनाने ४५ एकर जागा दिली आहे. यासाठी रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. पुढील ७ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now