अमेठी (उत्तरप्रदेश) येथे आधुनिक एके-२०३ रायफलींची निर्मिती होणार

अमेठी (उत्तरप्रदेश) – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असणार्‍या अमेठीमध्ये ‘एके-२०३’ या रशियन बनावटीच्या आधुनिक रायफलींची निर्मिती करण्यात येणार आहे. अमेठीमध्ये बंद पडलेल्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यात रशियाच्या सहकार्याने या रायफलींची निर्मिती करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. ही रायफल आधीच्या एके-४७ रायफलीची सुधारित आवृत्ती आहे. भारतीय सैनिकांसाठी याठिकाणी ७ लाख ५० सहस्र रायफलींची निर्मिती करण्यात येणार आहे. या रायफल्स ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत बनणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF