हिंदूंच्या मंदिरामध्ये पाक सैन्याची चौकी

नागपारकर (पाकिस्तान) – भारत आणि पाक सीमेवरील सिंधमधील नागपारकर जिल्ह्यातील करूंझर टेकडीवर अंबाजी मातेचे मंदिर आहे. या मंदिरालाच पाक सैन्याने त्यांची सीमेवरील शेवटची चौकी बनवली आहे. पूर्वी पाकिस्तानी सैनिक या मंदिराहून थोड्या दूरवर रहायचे. आता मात्र त्यांनी या मंदिरात चौकी बनवली आहे. या चौकीवरून समोरच्या प्रदेशात लक्ष ठेवणे सोपे जाते.

करूंझर पर्वताच्या एका बाजूला गुजरात आहे, तर दुसर्‍या बाजूला सिंध प्रांत आहे. त्यामुळे गुजरात आणि सिंधमधून मोठ्या प्रमाणात हिंदू या मंदिरात पूजा करण्यासाठी येत असतात. अंबाजीचे मंदिर एक जागृत देवस्थान मानले जाते. नागपारकर जिल्ह्यात हिंदू बहुसंख्य आहेत. बोडेसर बदतलाव जिल्ह्यातील हिंदू भाविक दररोज या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. अंबाजीच्या मंदिराव्यतिरिक्त इतरही अनेक मंदिरे या परिसरात आहेत.


Multi Language |Offline reading | PDF