महाशिवरात्रीनिमित्त पाकमधील कटासराज या शिवमंदिरात जाण्यास भारतीय हिंदूंनी टाळले

चकवाल (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील चकवाल जिल्ह्यामधील भगवान महादेवाचे प्राचीन कटासराज मंदिर आहे. महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी असते. एक सहस्र वर्षांहून प्राचीन असलेल्या या मंदिरात यावर्षी जाण्याचे भारतातील हिंदूंनी टाळले आहे. पुलवामा आक्रमणानंतर भारत आणि पाक यांच्यातील तणावामुळे भारतीय हिंदूंनी पाकमध्ये जाण्यासाठी व्हिसाच मागितलेला नाही. प्रथम १४१ भाविकांनी अर्ज केला होता; मात्र नंतर तणावाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी व्हिसा घेण्याचे टाळले. प्रतिवर्षी यासाठी २०० जणांना व्हिसा दिला जातो. हे मंदिर लाहोरपासून २८० किमीवर आहे.


Multi Language |Offline reading | PDF