देशद्रोही आणि हिंदुद्वेष्टे यांनी कितीही टाहो फोडला, तरी वर्ष २०२३ ला हिंदु राष्ट्राची स्थापना निश्‍चितच होणार ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

  • महर्षि व्यास यांच्या यावल (जिल्हा जळगाव) नगरीत घुमला हिंदु राष्ट्र स्थापनेचा बुलंद आवाज !

  • यावल येथे प्रथमच हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ३ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री. प्रशांत जुवेकर आणि सौ. क्षिप्रा जुवेकर

यावल (जिल्हा जळगाव), ५ मार्च (वार्ता.) – काही (अ)विचारवंत डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी आकाश-पाताळ एक करत आहेत. सनातन संस्थेने २० वर्षांपूर्वी प्रकाशित केलेला ‘क्षात्रधर्म साधना’ हा ग्रंथ वाचून पुरोगामी मंडळींच्या हत्या झाल्याचा जावईशोध तपासयंत्रणांनी लावला आहे. असा एखादा ग्रंथ वाचून हत्या होत असतील, तर पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर आक्रमण करणार्‍या जिहादी आदिलने कोणता ग्रंथ वाचला होता ? हे सांगण्याचे धाडस तपासयंत्रणा दाखवणार आहेत का ? काश्मीरमधील धर्मांध युवकांना ‘भारतमाता की जय’ आणि ‘वन्दे मातरम्’ म्हणायला सांगा, म्हणजे देशद्रोही आणि गद्दार कोण आहेत, हे आपोआप कळेल. मानवाधिकारांच्या नावाने अशा देशद्रोह्यांची बाजू घेणार्‍या पुरोगाम्यांच्या विरोधातही शासनाने कठोर कारवाई करायला हवी. ते करण्याऐवजी तपासयंत्रणा निर्दोष सनातनच्या पाठीशी लागल्या आहेत. हिंदुद्रोह्यांनी कितीही आरोळ्या मारल्या तरी आगीतून तावून-सुलाखून निघाल्याप्रमाणे सनातनचे निर्दोषत्व सिद्ध होईल. देशद्रोही आणि हिंदुद्वेष्टे यांनी कितीही टाहो फोडला, तरी वर्ष २०२३ ला हिंदु राष्ट्राची स्थापना निश्‍चितच होणार आहे, असे ठाम प्रतिपादन सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

सभेला उपस्थित भगवे ध्वजधारी धर्माभिमानी

येथील बी.एस्.एन्.एल्. कार्यालयासमोरील मैदानावर २८ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेत’ ते बोलत होते. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. सभेला उपस्थित ३ सहस्र ५००हून अधिक धर्माभिमानी हिंदूंचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा बुलंद आवाज संपूर्ण यावल शहरात घुमला !

समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर यांनी प्रारंभी शंखनाद केला. त्यानंतर दीपप्रज्वलन होऊन व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर वेदमंत्रपठण करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या मागील वर्षीचा कार्याचा आढावा समितीचे भुसावळ-यावल येथील समन्वयक श्री. उमेश जोशी यांनी मांडला. सभेचे सूत्रसंचालन श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले.

सभेच्या ठिकाणी हिंदु धर्मावरील आघात दर्शवणार्‍या तसेच धर्मशिक्षण देणार्‍या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यासह आपत्कालीन साहाय्य, प्रथमोपचार, स्वरक्षण प्रशिक्षण, आयुर्वेदिक वनस्पती, भारतीय संस्कृती यांविषयी माहिती देणार्‍या अनमोल ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. पाश्‍चात्त्य संस्कृती सोडून हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याविषयी आवाहन करणारा बालकक्ष सभेला येणार्‍यांचे लक्ष वेधून घेत होता.

प्रत्येक हिंदूने देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणार्थ शौर्यजागरण करणे आवश्यक आहे ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, रणरागिणी शाखा

प्रभु रामरायांनी त्रेतायुगात लंकेत जाऊन अधर्मी रावणाचा वध केला होता, भगवान श्रीकृष्णांनी द्वापरयुगात मथुरेत जाऊन दुष्ट कंसाचा नाश केला, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाला त्याच्या शामियान्यात जाऊन ठार केले. येथे कुठेही चर्चा, पुरावे हा भाग नव्हता, तर समाजव्यवस्था उत्तम रहावी म्हणून अधर्मियांचे दमन केले होते. आज विविध नावांनी जिहादी संघटना भारताला इस्लामिस्तान करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. या सर्व आघातांना सामोरे जाण्यासाठी हिंदूंंनी संघटित होणे, साधना करणे आणि शौर्याचे जागरण करणे आवश्यक आहे. आज प्रत्येक हिंदूने देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणार्थ शौर्यजागरण करणे आवश्यक आहे.

पाकिस्तान नेस्तनाबूत करण्यासह देशांतर्गत ‘मिनी पाकिस्तान’ संपवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

गेल्या ७१ वर्षांत देशातील दुर्बल, हतबल आणि धर्मांधांचे लांगूलचालन करणार्‍या राज्यकर्त्यांनी देशासमोरील जिहादचे संकट वाढवले आहे. आज भारतात अनेक जिल्हे संवेदनशील आहेत. प्रशासनाला जाणेही शक्य होत नाही, असे संवेदनशील भाग अनेक शहरांत असून त्यांना चक्क ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून ओळखले जाते. देशांतर्गत वाढलेली ही मिनी पाकिस्तान संपवण्याची ताकद आजच्या दुर्बल सेक्युलर व्यवस्थेत नाही. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे आदर्श हिंदु राष्ट्रच हवे.

श्री. प्रशांत जुवेकर यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. सेक्युलरवादाच्या पोपटपंचीमुळे पाकिस्तान शेफारला आहे. ‘साप, अग्नी आणि शत्रू यांना अर्धवट सोडू नये, तर संपूर्ण नष्ट करणे हितावह असते; कारण ते वाढण्याची आणि पुन्हा त्रास देण्याची शक्यता असते’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या तत्त्वानुसार जिहादची समस्या कायमची सोडवण्यासाठी पाकिस्तानला नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे.

२. वायूदलातील सैनिक १९६० च्या दशकातील मिग-२१ विमाने घेऊन अत्याधुनिक एफ्-१६ विमानांचा सामना करत आहेत. सैनिकांना अत्याधुनिक साहित्य मिळवून देण्यावरूनसुद्धा राजकारण केले जात आहे. देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातही राजकारण करणारी स्वार्थी व्यवस्था आम्हाला नको, तर देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी आदर्श हिंदु राष्ट्राची व्यवस्था हवी आहे.

क्षणचित्रे

१. सभेला मोठ्या संख्येने उपस्थित असणारा महिलावर्ग घोषणा देऊन, वक्त्यांनी केलेल्या आवाहनांना हात उंचावून प्रतिसाद देत होता.

२. सभास्थळी धर्मप्रेमींनी मोठे भगवे ध्वज समवेत आणले होते. सभा चालू असतांना धर्मप्रेमी हे भगवे ध्वज घेऊन बसले होते.

३. व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिष्ठित साडेसहा फूट उंचीची भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

४. सभेनंतर वक्त्यांसमवेत राष्ट्र-धर्मविषयक प्रश्‍नांची चर्चा करण्यासाठी काही महिलाही थांबल्या होत्या.


Multi Language |Offline reading | PDF