पाकने भारताच्या विरोधात ‘एफ् १६’ चा वापर केला होता ! – पाकच्याच पत्रकाराची माहिती 

पाकचा खोटारडेपणा त्याचेच लोक उघड करत आहेत, ही पाकला आणि भारतातील राष्ट्रघातकी राजकीय पक्षांना चपराक होय !

इस्लामाबाद – पाकने बालाकोट येथे भारताच्या कारवाईनंतर पाकच्या विमानांनी भारतात घुसखोरी केली. यात पाकचे ‘एफ् १६’ हे विमान पाडण्यात आले. तेव्हा पाकने ‘या घुसखोरीत एफ् १६ सहभागी नव्हते आणि ते पडलेलेही नाही’, असे म्हटले आहे; मात्र आता पाकमधीलच एका पत्रकाराने पाकच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडला आहे. पाकचे पत्रकार तहा सिद्दीकी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, माझ्या सूत्रांनी सांगितले की, भारताच्या विरोधात पाकच्या वायूदलाच्या कारवाईमध्ये एफ् १६ चा वापर करण्यात आला होता. तहा सिद्दीकी यांनीच बालाकोट येथील आक्रमणात जैश-ए-महंमदच्या केंद्राची हानी झाल्याची स्वीकृती देणारी मसूद अझहर याचा भाऊ मौलाना अम्मार याची ध्वनीचित्रफीत समोर आणली होती.


Multi Language |Offline reading | PDF