किती जण ठार झाले, ते मोजण्याचे काम आम्ही करत नाही ! – वायूदलप्रमुख धनोआ

आमची कारवाई अद्याप संंपलेली नाही !

‘किती आतंकवादी ठार झाले ?’, असे विचारणार्‍या राजकीय पक्षांना चपराक !

नवी देहली – भारतीय वायूदलासाठी नियोजित लक्ष्यावर प्रहार झाला कि नाही, हे महत्त्वाचे असते. त्या प्रहारामध्ये किती जण ठार झाले, हे मोजण्याचे काम आमचे नाही. ते सरकारचे काम आहे, असे सडेतोड उत्तर भारतीय वायूदलाचे प्रमुख एअरचिफ मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ यांनी पत्रकार परिषदेत केले. गेल्या २ दिवसांपासून भारतातील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आदी विरोधी पक्ष ‘या कारवाईत किती जण ठार झाले?’, हे सांगण्याची मागणी करत आहेत. यासाठी विरोधी पक्षांनी विदेशी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांचा संदर्भ दिला आहे. अनेक विदेशी वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींच्या हवाल्याने ‘बालाकोट येथे कोणीही ठार झाल्याचे आढळून आलेले नाही’, असे विरोधकांकडून म्हटले आहे.

जंगलात बॉम्ब टाकले असते, तर पाकिस्तान चवताळला असता का ?

धनोआ पुढे म्हणाले की, आम्ही लक्ष्य ठरवल्यानंतर त्यावरच प्रहार करतो. पाकिस्तानातील बालाकोटमध्ये आम्ही लक्ष्यावर अचूक प्रहार केला. ‘आम्ही जंगलामध्ये बॉम्ब टाकले, तर मग पाकिस्तानने त्यावर प्रतिक्रिया का दिली ?’, असा प्रश्‍न त्यांनी विचारला.


Multi Language |Offline reading | PDF