मसूद अझहर बहावलपूर येथील जैशच्या मुख्य तळावर

पाकच्या बहावलपूर येथे जैशचे मुख्यालय आहे ! हे नष्ट करण्याचे धाडस आता भाजप सरकारने दाखवून दिले पाहिजे !

इस्लामाबाद – एकीकडे जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांकडून दिले जात असतांना तो जिवंत असल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘एएन्आय’ या वृत्तसंस्थेने पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने मसूद अझहर जिवंत असल्याचे म्हटले आहे. ‘भारताने बालाकोटमध्ये केलेल्या कारवाईमध्ये मसूद ठार झाला’, ‘कर्करोगामुळे त्याचा मृत्यू झाला’, असे प्रसारमाध्यमांकडून निरनिराळे सांगण्यात येत होते. याविषयी जैशनेही तो जिवंत असल्याचे म्हटले होते.

पाक सैन्याने ३ मार्च या दिवशी मसूद याला रावळपिंडी येथील सैनिकी रुग्णालयातून बहावलपूर येथील गोथ गन्नी येथे असणार्‍या जैशच्या तळावर नेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

मसूद अझहर जिवंत ! – पाकच्या पंजाब प्रांताचे मंत्री फय्याज हसन

‘एएन्आय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पाकमधील पंजाब प्रांताचे मंत्री फय्याझ ऊल हसन कोहन यांनी मसूद अझहर जिवंत असल्याचे म्हटले आहे. त्याच्या मृत्यूची कुठलीच अधिकृत माहिती आपल्याकडे नाही, असे त्यांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF