‘लव्ह जिहाद’ हा भारतातील मोठा आतंकवाद ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे

घाटकोपर येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी शाखेचा’ वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सौ. शर्मिला बांगर आणि वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे

मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – पुलवामा येथे ज्याप्रमाणे देशांतर्गत आतंकवाद्याने आक्रमण घडवून आणले, त्याप्रमाणे ‘लव्ह जिहाद’ नामक देशी आतंकवाद संपूर्ण देशभरात नियोजनबद्धरित्या कार्यरत असून या माध्यमातून हिंदु मुलींना फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यांच्याशी निकाह करून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे, त्यांची आखाती देशांमध्ये विक्री करणे, आतंकवादी कृत्यासाठी त्यांचा वापर करणे यांसारखे प्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याविषयी हिंदु माता-भगिनींमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची आज नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे, असे मत रणरागिणी शाखेच्या वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी व्यक्त केले. घाटकोपर येथील सावरकर सभागृहात २ मार्च या दिवशी पार पडलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी शाखे’च्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. शर्मिला बांगर उपस्थित होत्या. सनातन संस्थेच्या सद्गुरु कु. अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सविता लेले यांनी केले. स्वरक्षण प्रशिक्षणाची अपरिहार्यता दाखवून देणारी शौर्य जागरणाची प्रात्यक्षिके या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी सादर केली.

धर्माचरण करून साधना करणे ही काळाची आवश्यकता  ! – सौ. शर्मिला बांगर

आजच्या तरुण पिढीवर पाश्‍चात्त्य संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात पगडा जाणवतो. आज पाश्‍चात्त्यांचे सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरे होऊ लागले आहेत. प्राचीन अशा हिंदु संस्कृतीपासून आपण दुरावत आहोत. जुन्या पिढीवर असलेले धर्माचरणाचे संस्कार आज लोप पावले आहेत. त्यामुळे देशात स्वैराचार माजला आहे. धर्माचरणातून मिळणारी सात्त्विकता आपण गमावू लागलो आहोत. ही स्थिती पालटण्यासाठी आणि येणार्‍या कठीण काळाला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने साधना करून धर्माचरण करणे ही काळाजी आवश्यकता बनली आहे.

क्षणचित्रे

१. लव्ह जिहादची भयावहता स्पष्ट करणारी ध्वनीचित्रफीत या वेळी प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आली.

२. शौर्यजागरणाची प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.

३. उपस्थितांपैकी अनेक महिलांनी यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.

आभार

१. आनंदनगर उत्कर्ष मंडळाचे श्री. शैलेंद्र विचारे आणि श्री. सुनील सावंत यांनी कार्यक्रमासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.

२. लक्ष्मीबाग सहकारी पतसंस्थेने कार्यक्रमासाठी पटल आणि आसंद्या उपलब्ध करून दिल्या.


Multi Language |Offline reading | PDF