देशातील देशद्रोह्यांच्या विरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ आवश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

हडपसर (पुणे) येथील हिंदु धर्मजागृती सभा !

‘हिंदु राष्ट्र कि करो तैय्यारी । आ रहे है भगवाधारी ।’ असा जयघोष करत उपस्थितांनी चेतवले हडपसर परिसरात हिंदुत्व !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर,
राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

हडपसर (पुणे), ४ मार्च (वार्ता.) – ‘भारताला कसेही संपवा’, असे म्हणणार्‍या ‘जमात-ए-इस्लामी’चा संस्थापक हा औरंगाबादचा. वर्ष २००८ च्या मुंबई आक्रमणातील अबू जिंदाल हा बीडचा. असे अनेक आतंकवादी आज भारतातील ‘मिनी पाकिस्तान’मध्ये सिद्ध होत आहेत; म्हणूनच ज्याप्रमाणे देशाबाहेर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून आतंकवाद्यांना धडा शिकवला, त्याचप्रमाणे भारतातील देशद्रोह्यांच्या विरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करायला हवा, तर देशाचे संपूर्ण संरक्षण होईल, असे परखड प्रतिपादन अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ मार्च या दिवशी येथील कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या सभेला ३ सहस्र ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या भीतीपोटी पुरोगाम्यांचा सनातनला विरोध ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

मार्गदर्शन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

तथाकथित पुरोगामी सनातन संस्थेवर बंदीची मागणी करतात. सनातन संस्था ही अखंड हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत आहे. वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे; परंतु ‘हिंदु राष्ट्र आले, तर आपली दुकानदारी कशी चालणार’, या भीतीपोटी तथाकथित पुरोगामी, (अ) विचारवंत सनातनला विरोध करतात; मात्र सनातनवर श्रीकृष्णाचा वरदहस्त असल्याने तिचे कार्य कधीच थांबणार नाही.

पांगळी लोकशाही नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचे रसायन हवे ! – सुनील घनवट

श्री. सुनील घनवट

साप, अग्नी, शत्रू यांना अर्धवट जिवंत ठेवू नये; कारण ‘ते अधिक घातक आहेत’, असे धर्मशास्त्र सांगते. आणखी सर्जिकल स्ट्राईक करण्यापेक्षा पाकलाच नष्ट करायला हवे. पुलवामा आक्रमणाचा सूड घेण्यासाठी देशाला युद्धमंत्री आवश्यक आहे. देशाला पांगळी लोकशाही नव्हे, तर छत्रपती शिवरायांचे रसायन हवे, ते हिंदु राष्ट्रातूनच मिळेल.


Multi Language |Offline reading | PDF